mla sunil shelke, uday samant, general motors workers strike talegaon saam tv
महाराष्ट्र

Talegoan MIDC : अन्याय झाला तर गाठ माझ्याशी... सत्ताधारी आमदारांचा उद्याेगमंत्र्याच्या साक्षीने सरकारला गर्भित इशारा

general motors workers strike talegaon : गेल्या 20 दिवसांपासून जनरल मोटर्सचे कामगार आंदाेलन करीत आहेत.

दिलीप कांबळे

Maval News : जनरल मोटर्सच्या कामगारांवर अन्याय झाला तर त्या नामांकित कंपनीला मावळात पाय ठेवू देणार नाही असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांच्या समोरच दिला. यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या मावळचे आमदार सुनील शेळकेंनी (mla sunil shelke)  कामगारांच्या हिताचा विचार करीत सरकारलाच घरचा आहेर दिल्याची जाेरदार चर्चा मावळात सुरु आहे (Maharashtra News)

मावळात गेल्या वीस दिवसांपासून जनरल मोटर्सच्या एक हजार कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. सरकारचा निरोप घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगारांच्या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या समोरच सरकारला कडक शब्दांत इशारा दिला.

आमदार सुनील शेळके म्हणाले जनरल मोटर्स कंपनी आणि कामगार मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी सेटलमेंट केली नसती तर मावळ मधील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती. कामगार मंत्रालयाने क्लोजर रिपोर्ट देताना कामगारांची बाजू ऐकून घेतली नाही.

कोर्टाचा निकाल येण्याआधीच क्लोजर रिपोर्ट देण्यात आला यामध्ये कामगारांना प्री प्लान करून अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा आराेप देखील आमदार सुनील शेळके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समोर केला.

आमदार शेळके म्हणाले मावळात येणाऱ्या नामांकित कंपनीचे आम्ही स्वागत करुच परंतु त्या कंपनीने जनरल मोटर्स मधील कामगारांवर अन्याय केला तर कंपनीला मावळ तालुक्यामध्ये पाय देखील ठेवू देणार नाही असा इशारा आमदार शेळकेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समोर सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT