mla sumantai patil saam tv
महाराष्ट्र

Sangli News : टेंभूच्या पाण्यावरुन राजकारण तापलं, राेहित पाटलांनी विराेधकांना फटकारलं; आमदार सुमनताईंचे आजपासून बेमुदत उपाेषण

Tembhu Water Issue : पाण्यावरुन केले जाणारे राजकारण याेग्य नसल्याचे राेहित पाटील यांनी नमूद केले.

विजय पाटील

Sangli News : टेम्भू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई आर आर पाटील आजपासुन (साेमवार) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. (Maharashtra News)

आमदार सुमनताई पाटील (mla sumantai patil latest marathi news )या त्यांच्यासमवेत मुलगा रोहित पाटील आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन उपोषण सुरू करणार आहेत. वारंवार मागणी करून ही प्रशासनाकडून पाण्यापासून वंचित असणा-या गावांचा टेम्भू योजनेत समावेश करण्यात येत नसल्याने हे आंदाेलन असणार आहे.

आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी राज्य सरकार विरोधात थेट बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतल्याने त्यांना ग्रामस्थांचा अधिकाधिक पाठींबा मिळू लागला आहे. जोपर्यंत टेम्भू योजनेत समावेश होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार देखील पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान समाज माध्यमातून हाेणा-या टिकेस उत्तर देताना युवा नेते राेहित पाटील म्हणाले जनता, ग्रामस्थ हे सूज्ञ आहेत. आर. आर. आबा यांच्यापासून आमचे कुटुंब राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करताे हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे या टिकेचे उत्तर जनताच विराेधकांना देईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT