Ajit Pawar, Mla Shekhar Nikam, Maharashtra News saam tv
महाराष्ट्र

After Ajit Pawar Rebel's: 'मला शरद पवार यांची मनापासून माफी मागायची आहे'; अजित पवारांना साथ देणारा आमदार भावुक

Mla Shekhar Nikam News : ईडीचा विषय नाही. मी पदासाठी गेलो नाही असंही निकम यांनी नमूद केले.

अमोल कलये

Ratnagiri News : यापूर्वी दादांनी मला 5 - 5 वेळा कॉल केले होते. पण मी गेलो नाही. यावेळी दादांना मी शब्द दिला आणि त्यांच्यासमवेत जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिलाे. परंतु काळजावर दगड ठेऊन निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बंडखाेर चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघचे आमदार शेखर निकम (chiplun sangameshwar mla shekhar nikam) यांनी नमूद केले. ते आज रत्नागिरी (Ratnagiri) येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

आमदार शेखर निकम म्हणाले मी अजित पवार यांच्या साेबत राहण्याचे निश्चित केले आहे. दादांनी मला अडचणी वेळी कायम मदत केली आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाेबत जाण्याचा निर्णय घेतला. मला शरद पवार (sharad pawar latest news), सुप्रिया सुळे (supriya sule), रोहित पवार (rohit pawar) यांचा कॉल आल्याचे निकम यांनी सांगितले. परंतु मी शरद पवार साहेबांशी बोलू शकलो नाही असेही शेखर निकम यांनी नमूद केले.

ईडीचा विषय नाही

आमदार शेखर निकम पुढं बाेलताना म्हणाले आता परिणामांची पर्वा नाही. मी दादांसोबत जे होईल ते होईल. आमचं घर फोडले तरी रुपया मिळणार नाही. ईडीचा विषय नाही. मी पदासाठी गेलो नाही असंही निकम यांनी नमूद केले.

राजकारण साेडलेले बरं

दरम्यान आमदार शेखर निकम म्हणाले शरद पवार (sharad pawar) यांची मनापासून माफी मागायची आहे. खरंतर अशावेळी आमच्यासारख्या लहान माणसाचे खूप हाल होतात. राजकारण सोडलेले बरे अशी माझी मानसिकता असल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT