shambhuraj desai, satara, gram panchayat election, patan
shambhuraj desai, satara, gram panchayat election, patan Saam TV
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंचा करिष्मा; तब्बल 22 वर्षानंतर ताब्यात आली ग्रामपंचयात (व्हिडिओ पाहा)

साम न्यूज नेटवर्क

Shambhuraj Desai : शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीवर तब्बल बावीस वर्षानंतर सत्ता हस्तगत केली आहे. यामुळे आमदार देसाईंच्या गटात उत्साही वातावरण आहे. (Gram Panchayat Election Result 2022)

आज राज्यातील विविध ग्रामपंचयातींच्या निवडणुकीचा निकाल घाेषित हाेऊ लागला आहे. राज्यातील काही भागात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात चूरस आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उत्तर तांबवे या ग्रामपंचायतीत बावीस वर्षानंतर सत्तांतर झालं आहे. उत्तर थांबवे ग्रामपंचायतीत आमदार शंभूराज देसाई यांच्या पॅनलंने सात पैकी चार जागा जिंकल्या आहे.

या निवडणुकीच्या निकालानंतर देसाई यांच्या गटातील समर्थकांनी एकत्रित येत जल्लाेष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आमदार शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) नावाचा जयघाेष केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

SCROLL FOR NEXT