MLA Sandeep Kshirsagar's amazing dance video goes viral saam tv
महाराष्ट्र

Sandip Kshirsagar Video: "वर ढगाला लागलीय कळं..." गाण्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांचा भन्नाट डान्स

Sandip Kshirsagar Dance Video: बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.

Chandrakant Jagtap

MLA Sandip Kshirsagar Dance Video: बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भन्नाट डान्सचां व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी आमदार आमरसिंह पंडीत यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळयास आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातर त्यांनी वारातीत चांगलाच ठेका धरला. त्याच्या या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमरसिंह पंडीत यांच्या पुतण्याचा शाही विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या विवाह सोहळ्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मिळून वरातीत भन्नाट डान्स केला. आधी दादा कोंडके यांच्या 'वर ढगाला लागलीय कळं...' गाण्यावर ठेका धरल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा त्यांना नाचण्याचा आग्रह केला.

त्यानंतर त्यांनी 'मैं हू डॉन' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडीतही उपस्थित होते. या विवाह सोहळ्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या डान्सचे हे व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! पुण्यातील जोडप्याकडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; ५ दिवसांनी चिमुकला सापडला पंजाबमधील वृद्धश्रमात

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

SCROLL FOR NEXT