Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : हिवाळी अधिवेशनासाठी पप्पू, बाप्पू नागपुरात; रवी राणा यांची ठाकरे पिता-पुत्रांवर बोचरी टीका

हिवाळी अधिवेशनासाठी पप्पू, बाप्पू नागपुरात आले आहेत, अशी बोचरी टीका रवी राणा यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ravi Rana News : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील नेते, मंत्री नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील नागपुरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या जोरदार टीका केली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी पप्पू, बाप्पू नागपुरात आले आहेत, अशी बोचरी टीका रवी राणा यांनी केली आहे. (Latest Marathi News)

अपक्ष आमदार रवी राणा यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पिता-पुत्रावर बोचरी टीका केली आहे. रवी राणा (Ravi Rana) म्हणाले, ' अधिवेशनाला पहिल्यांदा उद्धव ठाकरे आले आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने नाव आहे बाप्पू आणि त्यांचा मुलगा पप्पू. ते दोघे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आले आहेत'.

'मला त्यांना विनंती आहे की, हे अधिवेशन पूर्णपणे चालू द्या. कुठलाही गोंधळ करू नका. हिवाळी अधिवेशनात कोणतंही राजकारण करू नका, असेही रवी राणा पुढे म्हणाले.

दरम्यान, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'अडीच वर्षात नागपुरात का आले नाही, अधिवेशन का घेतलं नाही? मुख्यमंत्री असताना विदर्भाला न्याय देण्याची जबाबदारी नव्हती का? आता विदर्भाची लोक तुमची आरती करणार का? तुमचा काळ गेला आहे. आता देवेंद्र आणि एकनाथजी यांचा काळ आला आहे. तुम्ही कितीही बैठका घ्या, कोणी विचारणार नाही. २०२४ मध्ये तुम्हाला उमेदवारही मिळणार नाही. कशाला गडबड करता, अशा शब्दात बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT