mla prashant bamb criticizes radhakrishna vikhe patil on jayakwadi dam water issue saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam: विखे जिल्ह्याचे नव्हे राज्याचे मंत्री, जायकवाडीच्या पाणी प्रश्नावरून भाजप आमदाराचा टाेला (पाहा व्हिडिओ)

जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News :

मंत्री हे कुण्या जिल्ह्याचे नसतात तर ते महाराष्ट्राचे असतात. त्यामुळे विखे पाटील यांची भेट घेऊन विभागा-विभागांमध्ये भांडण लागतील असे ठराव घेऊ नये अशी विनंती करणार असल्याचे आमदार प्रशांत बंब (mla prashant bamb) यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. नगर जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला सोडू नये अशी भूमिका सर्व पक्षातील नेत्यांनी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे झालेल्या जिल्हा नियाेजन बैठकीत घेतली. त्यावर आमदार बंब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केेली. (Maharashtra News)

पाणी प्रश्नावर सतत पाठपुरावा करणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी यावर आक्षेप घेतला आहे. आता मंत्रीच जर बिनधास्त कायद्याची पायमल्ली करीत असतील तर कुणापासून काय अपेक्षा ठेवायची, असा प्रश्न आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ आहे असं सध्या चित्र दिसतेय.

यामुळे जायकवाडीच्या पाण्यावरून आता राजकीय पटलावर मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समन्यायी पाणीवाटपाचा नियम पाळायचाच नाही, असं अहमदनगर आणि नाशिकच्या नेत्यांनी ठरवल्याचा आरोप होऊ लागला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

SCROLL FOR NEXT