mla narendra bhondekar supports mp sunil mendhe on eve of ram mandir inauguration ayodhya saam tv
महाराष्ट्र

Ram Rath Yatra : 'व्हिजन क्लिअर झाले, मी लक्ष्मणासारखा तुमच्या पाठीशी राहीन'; नरेंद्र भोंडेकरांचा सुनील मेंढेंना शब्द

अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त रथयात्रा काढण्यात आली हाेती.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

आता नक्कीच मला वाटते आता काही व्हिजन क्लिअर झाला. आता काही अडचण राहणार नाही. खासदार सुनील भाऊ युद्धामध्ये रामासोबत जसा लक्ष्मण होता तसा हा आमदार नरेंद्र भोंडेकर (mla narendra bhondekar) तुमच्या पाठीशी राहील असा विश्वास आमदार भाेंडकेकर यांनी खासदार सुनील मेंढे (mp sunil mendhe) यांना दिला. (Maharashtra News)

अयोध्येत (ayodhya) होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना (ram mandir pran pratishtha) सोहळ्याच्या (ram mandir inauguration) अनुषंगाने खासदार सुनील मेंढे (mp sunil mendhe) यांनी 20 दिवसांपूर्वी श्रीराम रथयात्रा काढली होती,या श्रीराम रथयात्रेचा समारोप व कारसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम रविवारी रात्री भंडारा येथील रेल्वे मैदानावर झाला.

या कार्यक्रमात बाेलताना आमदार भोंडेकर म्हणाले खासदर सुनील भाऊंनी अनेक दिवसांपासून ही रथयात्रा काढली. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ (devendra fadnavis) आल्यामुळे सार्थकी ठरली. आता नक्कीच मला वाटते आता काही व्हिजन क्लिअर झाला. आता काही अडचण राहाणार नाही.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जे काही युद्धामध्ये सुनील भाऊला या लक्ष्मणाची गरज पडेल तुम्ही राम मी लक्ष्मण म्हणून तुमच्या पाठीशी राहील एवढेच ठिकाणी सांगू इच्छितो. मग जिल्ह्यातील केवढेही मोठे नेते असतील पण तुमच्यासोबत रामासोबत जसा लक्ष्मण होता तसा हा नरेंद्र भोंडेकर तुमच्या पाठीशी राहील एवढेच मी या ठिकाणी सांगून इच्छितो असे वक्तव्य आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

आमदार भाेंडेकर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राजकीय वर्तुळातील अनेकांची भुवया उंचावल्या गेल्या आहेत हे मात्र विशेष.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT