Uddhav Thackeray & Sharad Pawar
Uddhav Thackeray & Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

'साहेबांनी ठरवलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'रयत' चे अध्यक्ष हाेतील'

ओंकार कदम

सातारा : शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (mahesh shinde) यांनी खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी रयत शिक्षण संस्थेचा (rayat shikshan sanstha) अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे मोठे विधान केले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद हे मुख्यमंत्र्यांच्याकडे असावे असे संस्थेच्या घटनेमध्ये नमूद आहे असेही आमदार शिंदे यांनी म्हटलं आहे. साहेबांनी ठरवलं तर एका मिनीटांत ते रयत कर्मचा-यांकडे सुपुर्द करु शकतात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रयतचे अध्यक्ष हाेऊ शकतील. (shivsena mla mahesh shinde demands ncp president sharad pawar to appoint maharashtra cm uddhav thackreay as president of rayat shikshan sanstha in satara)

आमदार महेश शिंदे (mahesh shinde) म्हणाले संचालक मंडळामध्ये शरद पवार (sharad pawar) यांच्या कुटुंबियांच्या निकटवर्तीय नऊ जण असून रयत शिक्षण संस्था (rayat shikshan sanstha) त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आता या संस्थेचे खाजगीकरण होऊ नये अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सध्या रयत शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

नोकर भरती आणि प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून प्रवेशासाठी १८ हजार आणि नोकरीसाठी ४० लाख मागितले जात आहेत असा आराेप देखील आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT