mla mahesh shinde, mahesh shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtras Political Crisis : शिवसेनेच्या आमदारास Full Confidence म्हणाले निकालाची धास्ती आम्हांला नाही, बारामतीचे पिंगळे...

MLA Mahesh Shinde On SC Hearing: सर्वाेच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे राज्यासह देशातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

ओंकार कदम

Supreme Court Verdict: सत्ता संघर्षाच्या (SC Hearing On Maharashtra Political Crisis) निकालाची धास्ती आम्हांला नाही. निकाल आमच्याच बाजुनं मात्र आमच्या विरोधात बारामतीचे पिंगळे कंदील घेवुन फिरताहेत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटातील शिवसेना आमदार महेश शिंदेंनी (mla mahesh shinde) केली. दरम्यान एकीकडे सगळ मंत्रिमंडळ टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे आमदार महेश शिंदे यांनी मात्र जनतेमध्ये जाऊन नवीन विकास कामांच्या भूमिपूजन करण्याचा तडाखा लावला आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल (Supreme Court Final Decision on Shivsena Case) थोड्याच वेळात लागणार आहे. राज्यातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलावर आहे. यापैकी एक असलेले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे हे आज त्यांच्या मतदारसंघांत जनतेत जाऊन विकासकामांचे भूमिपूजन करत आहे.

साम टीव्हीशी बाेलताना आमदार महेश शिंदे म्हणाले सत्ता संघर्षाचा निकाल असला तरी आम्ही जनतेतील लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही जनतेत राहणार. आम्हांला निकालाची धास्ती नाही. आम्ही जनतेच्या विश्वासास पात्र ठरलो असुन निकाल आमच्याच बाजुचा होईल असं सांगत शिंदे यांनी राष्ट्रवादीवर मोठी टिका केली.

ते म्हणाले बारामतीचे पिंगळे आमच्या विरोधात कंदील घेवुन भविष्य वर्तवत फिरताहेत, मात्र जनता आमच्या पाठिशी आहे. अजित पवारांना (ajit pawar not reachable) माहित आहे पक्षात थांबुन उपयोग नाही. बाहेर पडावं लागेल यामुळं विरोधी पक्ष टिकणार नाही. यामुळंच ते आता नाॅट रिचेबल असतील असा दावा आमदार महेश शिंदे यांनी‌ केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT