mla kiran lahamate, sharad pawar, ajit pawar, ncp, akole news saam tv
महाराष्ट्र

Pawar Vs Pawar : अजितदादांनी चार वर्षात नऊशे कोटींचा निधी दिला, त्यांची साथ साेडणार नाही; शरद पवारांशी चर्चा न करता आमदार परतले

मी कालही पिचड विरोधक होतो आणि आजही पिचड विरोधक म्हणूनच कार्यरत राहणार असे लहामटे यांनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Kiran Lahamate News : जनतेच्या मताचा आदर करून मी अजितदादांसमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भावनिक होऊन शरद पवारांसोबत गेलो होतो परंतु विकासकामांचा विचार करुनच दादांसाेबत राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अकाेलेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे (ncp mla kiran lahamate) यांनी आज स्पष्ट केले. (Maharashtra News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे अकोलेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे म्हणाले हाेय मी दादांच्या शपथविधीला गेलाे हाेताे. त्यानंतर भावनिक होऊन शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान जनता विकास कामाबद्दल आपल्याला जाब विचारेल. त्यामुळे जनतेच्या भावनांचा देखील मला विचार करावा लागला असे डाॅ. लहामटे यांनी नमूद केले. ते म्हणाले सन २०१९ ला अजितदादांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. चार वर्षात आठशे ते नऊशे कोटींचा निधी दिला आहे. राजकारण शेवटी विकासासाठी करायचे असते असेही त्यांनी नमूद केले.

डाॅ. लहामटे म्हणाले निधी देण्याचे काम अजितदादांकडूनच होऊ शकते तसेच जनतेच्या मताचा आदर करून अजितदादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आपली शरद पवारांसोबत (sharad pawar) पुन्हा काही चर्चा झाली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी कालही पिचड विरोधक होतो आणि आजही पिचड विरोधक म्हणूनच कार्यरत राहणार असे ठामपणे सांगताना लहामटे यांनी माझी बांधिलकी अजित पवारांसोबत असून मतदारसंघात यापूर्वी माझा जो अजेंडा होता तोच राहाणार असल्याचे स्पष्ट केेले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT