mla bharat gogawale helped injured at pandharpur mhapral road saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Mhapral Road Accident News: भीषण अपघात पाहताच आमदार भरत गोगावलेंनी थांबविला ताफा अन्...

सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Mla Bharat Gogawale News :

पंढरपूर म्हाप्रळ रस्त्यावर झालेला भीषण अपघात पाहताच याच रस्त्यावरुन प्रवास करीत असलेल्या आमदार भरत गाेगावले (mla bharat gogawale) यांनी त्यांचा ताफा थांबविला. त्यानंतर आमदार गाेगावले यांनी तत्काळ अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली हाेती. (Maharashtra News)

पंढरपुर म्हाप्रळ रस्त्यावर एका कारची आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले. दरम्यान घटनास्थळावरून आमदार भरत गोगावले यांचा ताफा निघाला हाेता. त्यांनी तत्काळ त्यांचा वाहनांचा ताफा थांबविला.

आमदार गाेगावलेंनी स्वतःच्या सुरक्षेसाठी असलेली पोलिस गाडीत अपघातातील जखमींसाठी उपलब्ध करुन दिली. याच गाडीतून जखमींना तातडीने रुग्णालयात न्या असे नागरिकांना सांगितले. त्यानंतर आमदार गाेगावले यांनी रस्त्यावर निर्माण झालेली वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी देखील मदत केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा अपघात पंढरपुर म्हाप्रळ रस्त्यावरील आकेले गावच्या दद्दीत झाला आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT