CM Eknath Shinde, Bacchu Kadu , Karmala saam tv
महाराष्ट्र

टीम शिंदे गटातील आमदारानं स्पष्टच सांगितलं, मला मंत्री पदाची अपेक्षा आहे !

भारत नागणे

Pandharpur : उध्दव ठाकरे (uddhav thackeray) सेना भवन वर जेवढे शोभून दिसतात तेवढे मुख्यमंत्री म्हणून वर्षावर दिसले नाहीत असा टाेला आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांनी शिवसेवा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान आपल्याला मंत्रीपद हवं आहे असेही एका प्रश्नावर आमदार कडू यांनी स्पष्ट केले.

आमदार बच्चू कडू हे करमाळा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी रात्री आले होते. त्यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार कडू यांनी विविध घडामाेडींवर राजकीय भाष्य देखील केले.

आमदार बच्चू कडू म्हणाले उध्दव ठाकरे हे सज्जन माणूस आहेत. पक्ष प्रमुख म्हणून ते चांगले आहेत. सेना भवनात ते जसे शोभून दिसतात तसे ते मुख्यमंत्री म्हणून वर्षावर शोभून दिसले नाहीत. खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल असा टाेला ही आमदार बच्चू कडू यांनी ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान एका प्रश्नावर उद्धव ठाकरे खरे बोलले का शहा खरे बोलले हा संशोधनाचा विषय आहे. तो माझा विषय नाही. परंतु उद्धव ठाकरे सेना भवन वर जसे शोभून दिसले तेवढे वर्षावर मुख्यमंत्री म्हणून दिसले नाहीत. हे आमच्या दुर्दैवी होते असे म्हटलं. मी राजकारणी आहे. मला मंत्री पदाची अपेक्षा आहे. मी ताकला जाऊन भांडे लपवणारा नालायक माणूस नाही असे सांगत आमदार कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद हवं असे स्पष्टपणे जाहीर सांगून टाकलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

SCROLL FOR NEXT