Vande Bharat Express, Latur, Pune, Education Hub saam tv
महाराष्ट्र

Vande Bharat Express : 'या' मार्गावर तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करा; महाराष्ट्रातील आमदाराची मागणी

शुक्रवारी महाराष्ट्रात दाेन ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसला प्रारंभ झाला.

दिपक क्षीरसागर

Vande Bharat Express : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे (pune) आणि शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर (latur) या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express Latest News) सुरू करा अशी मागणी आमदार धीरज देशमुख (dheeraj deshmukh) यांनी केंद्र सरकारकडे (central government) शुक्रवार केली. हा निर्णय दोन शैक्षणिक केंद्रांना जवळ आणणारा व विद्यार्थी हिताचा ठरेल असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रात दाेन वंदे एक्सप्रेसचे लाेकार्पण केले. महाराष्ट्रातील व्यापारी केंद्र आणि तीर्थस्थळांना जोडण्यासाठी राज्यांतर्गत मुंबई- शिर्डी, मुंबई- सोलापूर या मार्गावर अत्याधुनिक सुविधा असलेली "वंदे "भारत एक्स्प्रेस" सुरू झाली आहे.

यामुळे शिर्डीबरोबरच सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना भेट देऊन दर्शन घेणे सोपे होणार आहे. याच धर्तीवर शिक्षणाचे केंद्र असलेल्या पुणे-लातूर या शहरासाठी राज्यांतर्गत तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी केली असल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले.

यामुळे हा निर्णय दोन शैक्षणिक केंद्रांना जवळ आणणारा व विद्यार्थी हिताचा ठरेल. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. तसेच शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरची सर्वदूर ख्याती आहे. या शहरासाठी राज्यांतर्गत तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस झाल्यास विद्यार्थ्यांचा विकास हाेईल अशी आशा आमदार देशमुखांना आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT