मिशन कवच कुंडल: नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ६६.६२ टक्के लसीकरण पूर्ण... दिनू गावित
महाराष्ट्र

मिशन कवच कुंडल: नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ६६.६२ टक्के लसीकरण पूर्ण...

जिल्ह्यात आतापर्यंत ६६.६२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रत्येक खेडे गावात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत प्रत्येक गाव-पाड्यावर कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६.६२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. (Mission Kavach Kundal: 66.62 percent vaccination completed so far in Nandurbar district)

हे देखील पहा -

नंदुरबार जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन कोरोना संसर्ग बाधित रुग्ण संख्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी जिल्ह्यात अठरा वर्षांच्या वरील एकूण १४ लाख ९३ हजार ७२० नागरिकांच्या लसीकरणाचा टारगेट असून जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या डोसची मात्रा एकूण ६ लाख ८० हजार ५८० नागरिकांना देण्यात आली आहे. तर दुसऱ्या डोसची मात्रा ३ लाख १४ हजार ४७६ नागरिकांना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गाव-पाड्यावरील नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी मिशन कवच कुंडल मोहीम योजनेअंतर्गत अभियान सुरू करण्यात आले असून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांमध्ये लसीकरणाची जनजागृती करण्यात येत आहे. अतिदुर्गम भागातील नागरिकांना लसीकरणासाठी गाव पाड्यावर शिबिरांचे आयोजन करून लसीकरणासाठी प्रोत्साहन केले जात आहे.

लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घेऊन प्रत्येक खेडे गावात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Balm Benefits: उन्हाळ्यात रोज लिप बाम लावल्याने काय होतं? जाणून घ्या फायदे आणि साइड इफेक्ट्स

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

SCROLL FOR NEXT