Arrest, Sangli News, Miraj, Police Saam Tv
महाराष्ट्र

Mhaisal Case : नऊ जणांच्या आत्महत्येप्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल; 13 अटकेत

वनमाेरे कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याप्रकरणी साेमवारी सांगली जिल्हा हादरला हाेता.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील म्हैसाळ (mhaisal) येथे एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली. डॉक्टर माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाने सावकारांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याचे समाेर आले. या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल झाला असून आजपर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीसांनी (police) दिली. (mhaisal latest marathi news)

नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे घरात मंगळवारी मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली हाेती. पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे (dr manik vanmore) आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे (popat vanmore) या दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांत समावेश आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या कुटुंबाने आर्थिक कारणावरून विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (dixit gedam) म्हणाले डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे , आई आक्काताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे तसेच राजधानी हॉटेल जवळ दुसऱ्या घरात डॉ माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांच्या मृत्यूप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. दोघा भावाच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात अनेकांची नावे आहेत. वनमाेरे कुटुंबाने सावकरांकडून कर्ज घेतले आहे. व्यापारासाठी हे कर्ज घेतले होते असे चिठ्ठीत नमूद आहे असेही गेडाम यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT