Eknath Shinde group Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा लांबणीवर, काय आहे कारण? वाचा…

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री तसेच आमदार गुवाहाटी दौरा करणार असल्याची चर्चा होती.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde Group Guwahati Tour : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री तसेच आमदार गुवाहाटी दौरा करणार असल्याची चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गटाचा गुवाहाटी दौरा आता लांबणीवर पडल्याची माहिती आहे. 'आम्ही येत्या 21 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार नाही. लवकरच नवीन तारीख जाहीर करू', असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.  (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या गटातील आमदार तसेच खासदार हे गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा होती. गुवाहाटीला जाऊन ते कामाख्या देवीचे दर्शनही घेणार असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती. येत्या 21 नोव्हेंबरला आम्ही पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहोत, असं शिंदे गटातील नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं.

मात्र, आता हा दौरा लटकल्याचं दिसत आहे. येत्या 21 तारखेला हा दौरा होणार नाही. या दौऱ्याबाबतची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याच्या नव्या तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

'येत्या 21 तारखेला गुवाहाटीला जाण्याची त्यांची तारीख ठरली होती. पण त्या दिवशी जिल्हा नियोजनाची बैठक असल्याने आम्ही तर जाणार नाही. मला वाटतं पुन्हा नवीन तारीख येईल, बघू नवीन तारीख काय मिळते ती', असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.

संजय राऊतांवर साधला निशाणा

'एकनाथ शिंदे 22 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला काही लोक होते. त्यांनी आम्हाला “दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे” असं म्हणून डिवचलं, असं सांगत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला'.

Edited By Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT