Gulabrao Patil saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil : धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याचे दुःख; मंत्री गुलाबराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवास स्थानावरती बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवीन चिन्ह निश्चित होण्याची शक्यता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वर्तवली आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव - दोन्हीही गटाची धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी होती मात्र चिन्ह नाही मिळालं याचं आम्हाला दुःख असल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवास स्थानावरती बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवीन चिन्ह निश्चित होण्याची शक्यता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी वर्तवली आहे.

शिवसेना संपली असा आम्ही कधी म्हणत नाही मात्र ताकतीच्या आधारावर पाहिलं तर दसरा मिळाव्यात कुणाची ताकद वाढली हे सिद्ध होत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

तर बाळासाहेबांची शिवसेना संपायची असती तर आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो असतो त्यामुळे कोणी काही म्हणत असलं तरी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली असल्याचे म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर निवडणूक आयोगाचा निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी नवीन चिन्हासाठी मात्र दोन्हीही पक्ष तयारीला लागले असल्याचे मतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Edited By -Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई रागवल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाने धरणात उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

Friday Horoscope : 'या' ३ राशींना आज लागणार लॉटरी, नशिबाचे दार उघडणार; वाचा १२ राशींचे भविष्य

Friday Horoscope: या राशींच्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे, वाचा आजचं राशीभविष्य

SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; 'या' अधिकृत वेबसाईटवर पाहा तुमचे गुण

SCROLL FOR NEXT