Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde Corona postive: मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण; नागपूर अधिवेशनानंतर केली चाचणी

Dhananjay Munde Corona postive : देशात jn.1 या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे सध्या घरात क्वारंटाइन आहेत.

Vishal Gangurde

Dhananjay Munde Corona postive:

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशात jn.1 या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूर अधिवेशनानंतर चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचे आढळले. धनंजय मुंडे सध्या घरात क्वारंटाइन आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नागपूर अधिवेशनानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. मुंडे हे सध्या पुण्यातील निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Corona Virus In India)

मुंडेंना दोन दिवसांपासून खोकला

मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील घरी आहे. मु्ंडे यांना गेल्या दोन दिवसांपासून खोकला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात मुंडे यांना कोरोनची लागण झाली.

जगाचा पुन्हा कोरोनाचा उद्रेक

जगभरातील काही देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, गेल्या महिन्याभरात जगात कोरोनामुळे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या महिन्याच्या या महिन्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या २४ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच कोरोनाच्या जेएन. १ व्हेरिएंटच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT