Ajit Pawar News  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : अजित पवार राष्ट्रवादीतून आमच्यात सामील झाले तर...'; शिंदे गटातील मंत्री असे का म्हणाले?

आमदार पोटे यांच्या अजित पवारांवरील वक्तव्यावर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारे

Deepak Kesarkar News : भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 'पहिल्या शपथविधीची वेळ सकाळी ऐवजी दुपारी असती तर आज दादा आपण मुख्यमंत्री राहिले असता, या पोटे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात वेगळ्याच राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आमदार पोटे यांच्या अजित पवारांवरील वक्तव्यावर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मंत्री दीपक केसरकर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दीपक केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दीपक केसरकर म्हणाले, 'राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची एकमेकांशी मैत्री असते. आदर असतो. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दलही आदर आहे. अजित पवार हे कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे संवाद साधत असतात. त्या मैत्रीपोटी प्रवीण पोटे यांनी विधान केल्याची शक्यता आहे'.

'अजित पवार आमच्यासोबत आले तर आनंदच आहे. अजित दादांची राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते, हे आम्ही बघितलं आहे. त्यामुळे अजित दादा राष्ट्रवादीतून आमच्यात सामील झाले तर आनंदच आहे, असं भाष्य दीपक केसरकर यांनी केले.

'एक उमदा नेता जर आमच्या सोबत आला तर कोणाला आवडणार नाही. म्हणून प्रवीण पोटे यांनी वक्तव्य केलं. त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहता कामा नये. राजकारण म्हणून पाहू नये. त्याला सकारात्मकदृष्टीने पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, दीपक केसरकरांनी अजित पवारांवर भाष्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. दीपक केसरकरांच्या या वक्तव्यावर अजित पवार काय भाष्य करतील, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरीडोर बाधित लोकांसाठी विशेष पुनर्वसन धोरण मंजूर

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT