Dada Bhuse News Saam tv
महाराष्ट्र

Dada Bhuse News: आदित्य ठाकरेंची गुप्त भेट घेतली का? दादा भुसेंनी स्वत:च दिला चर्चांना पूर्णविराम; म्हणाले...

Dada Bhuse News: दोघांच्या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. या कथित गुप्त भेटीवर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

तबरेज शेख

Dada bhuse News: नाशिकमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची कथित गुप्त भेट झाल्याच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. या कथित गुप्त भेटीवर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मंत्री दादा भुसे यांनी कथित भेटीवर नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसे म्हणाले,'२ ते ४ मराठा समाज कार्यक्रमात उपस्थित होते. ४ वाजेनंतर मी खासगी गाडीतून नातीच्या वाढदिवसाला आलो. माझ्या नातीचा पहिला वाढदिवस असल्याने इकडे आलो'.

'मालेगावात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने मालेगावला वाढदिवस साजरा न करता नाशिकला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रम आहे. मात्र, आदित्य ठाकरेंची भेट झालेली नाही. भेटीची कलपोकल्पित बातमी आहे, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

नेमकी कुठे भेट झाल्याची चर्चा होती?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली होती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टवर भेट झाल्याची माहिती हाती आली होती. मात्र, ही भेटीची कलपोकल्पित बातमी म्हणत दादा भुसे यांनी वृत्त फेटाळले.

तत्पूर्वी, मंत्री उदय सामंत यांनी दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्या कथित भेटीवर प्रतिक्रिया दिली.'एखादी व्यक्ती समोरून आली आणि आम्ही भेटलो, तर त्यात काय? योगायोग असू शकतो. त्याला राजकीय नजरेने पाहू नये, अशी सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT