minister chhagan bhujbal should resign demands obc jan morcha Saam TV
महाराष्ट्र

OBC Jan Morcha : छगन भुजबळ राजीनामा देतील आम्हांला खात्री आहे : डॉ.बी. डी.चव्हाण

या सर्व लढाईत राज्यातील ओबीसी समाज पेटून उठेल असेही डाॅ. चव्हाण यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावं असे आवाहन ओबीसी जन मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ.बी. डी.चव्हाण यांनी केली आहे. छगन भुजबळ हे राजीनामा देतील अशी आम्हांला खात्री आहे असेही डाॅ. चव्हाण यांनी नमूद केले. (Maharashtra News)

ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरावं अशी आम्ही भुजबळ यांना विनंती करणार आहोत असे डॉ.बी. डी.चव्हाण यांनी नमूद केले. ते म्हणाले.रस्त्यावरची लढाई आणि कोर्टाची लढाई लढू. या सर्व लढाईत राज्यातील ओबीसी समाज पेटून उठेल.

ओबीसी समजाला न्याय द्यायचा असेल तर छगन भुजबळ यांनी त्याग केला पाहिजे. या राज्यातील संपूर्ण ओबीसी आणि विमुक्त भटक्या जाती जमातीची, बलुत्तेदार समाजाची मानसिकता आहे की छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळ हे राजीनामा देतील अशी आम्हांला खात्री आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले. त्यांनी राजीनामा दिल्या नंतर या राज्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांच्या जाहीर सभा घेऊ. सरकारला सत्तेतून कसे उलथून टाकायचं ते आम्ही दाखवून देऊ असा इशारा ओबीसी जन मोर्चा मराठवाडा अध्यक्ष डॉ. बी. डी.चव्हाण यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT