Chhagan Bhujbal Latest News Saam TV
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: मी माझी भूमिका बदलणारच नाही; जीवे मारण्याच्या धमकीनंतर मंत्री छगन भुजबळ कडाडले

Chhagan Bhujbal Latest News: ओबीसी समाजासाठी घेतलेली माझी भूमिका मी सोडणार नाही, असं छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर ठामपणे सांगितलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

Satish Daud

Chhagan Bhujbal on Death Threat

गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात हे धमकीचं पत्र आलं. “तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे”, असा उल्लेख या पत्रात आहे, यावर बोलताना आज भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मला आजवर अनेक जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. तसे प्रयत्न देखील झाले आहेत. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. तसेच ओबीसी समाजासाठी घेतलेली माझी भूमिका मी सोडणार नाही, असं छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर ठामपणे सांगितलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

छगन भुजबळांनीच (Chhagan Bhujbal) माध्यमांसमोर धमकीचं पत्र दाखवलं. आपण हे सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं. जे काही परिणाम व्हायचे ते होतील. आपण पोलिसांना याची सगळी माहिती पुरवलेली आहे, असंही भुजबळ म्हणाले. (Latest Marathi News)

मला ठार करण्याचा कट रचण्यासाठी कुठल्या हॉटेलसमोर बैठक झाली. त्यातील गाड्यांचे क्रमांक काय आहेत वगैरे अशी माहिती मी पोलिसांना दिली असून अशा धमक्यांना घाबरून मी माझी भूमिका सोडणार नाही. समाजासाठी लढतच राहणार असंही भुजबळ यांनी ठामपणे सांगितलं आहे.

पूर्वी सुपाऱ्या घेऊन होत असलेले गँगवॉर आपण गृहमंत्री असताना आटोक्यात आले होते, असा उल्लेखही मंत्री छगन भुजबळांनी माध्यमांसमोर केला. हा सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारलेला अप्रत्यक्ष टोला मानला जात आहे. केला आहे. त्यामुळे हा थेट देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT