supriya sule and chandrakant patil  saam tv
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांनी केलं सुप्रिया सुळेंच्या RSSवरील विधानावर भाष्य; म्हणाले...

सुप्रिया सुळे यांच्या याच विधानावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

विश्वभूषण लिमये

Chandrakant Patil News : देशात 'पीएफआय' संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षासाठी बंदी घातली आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची काही लोकांनी केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याच्या मागणीवर चर्चा व्हायला व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या याच विधानावर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच सुप्रिया सुळेंच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विधानावर देखील भाष्य केलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संघावर बंदी आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. मात्र, संघ त्यातून उजळून निघाला वाढत गेला. त्यामुळे याची भीती संघाला कधीच नाही. जे करायचं ते घटनेच्या चौकटीत करा. कारण घटनेच्या चौकटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी कधीच टीकली नाही'.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून कोणता उमेदवार दिला जाईल, यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. 'भाजपची १३ जणांची कोअर कमिटी आहे. ती बसून निर्णय घेत असते. आमच्याकडे दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होते. काही पक्षांकडे निवडणुकाच होत नाहीत. आमच्याकडे कोणाला तिकीट पाहीजे असं नसतं, इच्छुक आपले पत्र देतात. त्यावर तेरा जणांची कोअर कमिटी निर्णय घेते'.

मुंबईत दोन दसरा मेळावा होणार आहे, यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 'अभ्यासक म्हणून वेळ मिळाला तर त्या दोघांसोबत आणखी कोणचे असेल तर तेही ऐकतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

Mumbai : धक्कादायक! केईम हॉस्पिटलमध्ये रूग्णाने केली आत्महत्या, हादरवणारे कारण आले समोर

SCROLL FOR NEXT