Bhagwat Karad Saam TV
महाराष्ट्र

भाजप राणा दाम्पत्यासोबत? केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची 'चुप्पी'

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या पाठीशी भाजपा आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना मात्र त्यांनी बगल दिली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: लोकशाही मध्ये जर कुणी हनुमान चालीसा म्हणायला जात असेन आणि त्यांच्या घरावर जर कुणी हल्ला करत असेल तर ही चिंता करणारी बाब असल्याचं वक्तव्य केंद्रीय अर्थ मंत्री भागवत कराड यांनी पत्रकार परिषेदे दरम्यान करत ज्या प्रमाणे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला झाला आणि महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ज्या प्रमाणे गुन्हे दाखल केले त्याच प्रमाणे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर ही दाखल केले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना देत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालीसा पठनाचे समर्थन ही केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी केले आहे.

दरम्यान रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या पाठीशी भाजपा आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना मात्र त्यांनी बगल दिली आहे. राज्यात भाजपा नेते राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करत असल्याच्या प्रश्नास ही त्यांनी उत्तर देण्यास टाळले. या वेळी भाजपा आमदार अतुल सावे यांनी ही राणा हे जरी अपक्ष निवडून आले आलेले असले तरी त्यांच्या मागे अमरावतीच्या जनतेचे जनमत असल्याचं म्हणत त्यांनी स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केलेले आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींवर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मातोश्रीला जाग आणण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा मातोश्रीवर गेल्याची प्रतिक्रिया आमदार अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना देत राणा दांपत्याच्या समर्थन केलंय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT