Maharashtra Temperatures Saam tv
महाराष्ट्र

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Maharashtra weather update News in Marathi : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्य कडाक्याची थंडी जाणवत आहे.

Namdeo Kumbhar

Weather Updates News in Marathi : दोन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात हळू हळू घट होत असल्याचे दिसत आहे. पावसाने पूर्णपणे माघार घेतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालाची थंडी जाणवत आहे. नाशिक, निफाड अन् धुळ्यासारख्या शहरातील कमाल आणि किमान तापमानात कमालाची घट झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यभरात थंडी पसरण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या सुरूवातीला राज्यभरत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, हरियाणासह उत्तर भारतात सध्या कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. लवकर महाराष्ट्रातही सर्वदूर थंडी पसरण्याची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे आकाश निरभ्र झाले आहे. महाराष्ट्राच्या तापमानात चढ-उतार होतोय. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये किमान तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली. येथील पारा १५ अंशांच्या खाली घसरलाय. दरम्यान, आज राज्याच्या किमान तापमानात घट होऊन गारठा हळूहळू वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हिंद महासागरात मालदीव आणि विषुववृत्ताजवळच्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी धुळ्यातील कमाल तापमान १२.६ अंशची नोंद झाली आहे. जळगाव, परभणी (कृषी), गडचिरोली, गोंदिया, ब्रह्मपूरी, नागपूर, अमरावती येथे किमान तापमान १५ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्याशिवाय उर्वरित राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे.

उत्तर महाराष्ट्रात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. उर्वरित महाराष्ट्रातही काही दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी थंडीत थोडासा गारठा जाणवत आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश होत कमाल तापमानात चढ- उतार होण्याचा, तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

Maharashtra News Live Updates: पुण्यात आचारसंहिता भंगाच्या १,२८५ तक्रारी

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचं काय खरं नाय..पर्थ कसोटीत भारताचा हा खतरनाक गोलंदाज करणार पदार्पण

Palak Paratha: मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये द्या पौष्टिक पालक पराठा; विसरून जातील बाहेरचे बर्गर फ्रॅंकी

Indian Army : इंडियन आर्मीत नोकरी, पगार २,१८,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT