Milk Producers Farmers Protest Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: 'भीक नको, घामाला दाम द्या', दूध दरासाठी शेतकऱ्यांचं उपोषणास्त्र

Milk Producers Farmers Protest: केंद्र सरकारने दुधाच्या भुकटीची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने दूध उत्पादक संतप्त झालेत. तर दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केलंय. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? हेच याबातमीच्या माध्यमातून जाणून घेऊ...

Satish Kengar

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा निर्णयाविरोधात राज्यात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी करत शुभम आंबरे आणि संदीप दराडे या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावात उपोषणाचं अस्त्र उगारलंय.

राज्यात साडेतीन लाख टन दूध भुकटी पडून असतानाच केंद्र सरकारने 10 हजार टन दूध भुकटीच्या आयातीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आधीच संकटात असलेला दुग्ध व्यवसाय आणखीच गाळात गेलाय.

आधीच 27 रुपये असलेला दर भुकटीच्या आयातीने आणखीच घसरलाय. त्यामुळे दूधाच्या उत्पन्नाचा खर्चही निघत नसल्याचे सांगत उपोषणकर्त्यांनी खर्चाची यादीच सांगितलीय.

पशूखाद्य- 3 किलो- 96 रुपये

हिरवा चारा- 25 किलो- 125 रुपये

दूध उत्पादकांची मजूरी- 100 रुपये

गायीच्या दूधाचं उत्पन्न- 250 रुपये

सरकारने अर्थसंकल्पात दूधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केलंय. मात्र अनुदानाची भीक नको तर दूधाला 40 रुपये प्रति लिटर हमीभाव देण्याची मागणी केलीय. त्यामुळे दूध उत्पादकांच्या मागण्यांवर फुंकर घालून कोंडी फोडणार की लोकसभेप्रमाणे सरकार तोंड पोळून घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT