Milk and Paneer Adulteration saam tv
महाराष्ट्र

आता सुटका नाहीच! दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर होणार 'मकोका' अंतर्गत कारवाई

Maharashtra government MCOCA action against food adulteration mafia : दूध, पनीरसह अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्या माफियांना आता चांगलाच जरब बसणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाला केल्या.

Nandkumar Joshi

भेसळखोरांची आता खैर नाही. दूध, पनीर आणि अन्नात भेसळ करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासनाला तशा सूचना केल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना शिंदेंनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत सन २०२६ २७ या वर्षासाठी विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे आणि त्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाही यासंदर्भातील बैठकीत बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणावेळी शिंदे यांनी या सूचना केल्या.

लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतात भेसळखोर

अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागू शकते. भेसळखोर थेट या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना कोणत्याही प्रकारची नरमाई न दाखवता 'मकोका' अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावा, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

या भेसळखोरांवर कारवाई करताना त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून त्यांना कायदेशीर पळवाटा मिळणार नाहीत, असेही शिंदे म्हणाले. तसेच, या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्यांच्यावर कारवाई होते, त्यांच्या खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू असताना कोणतीही कायदेशीर त्रुटी उरता कामा नये. यासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी तातडीने एक विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधी व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Maharashtra News Live Update: वणीत प्रकल्प बाधिताचा रोजगार मेळावा

Pune Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; बुधवारी तीन तास कनेक्टिंग लिंक बंद

Shocking: लाईट बिल कसं भरू? सफाई कर्मचारी महिलेला आलं एका महिन्याचं 2 लाख 18 हजाराचं वीजबिल

Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' का जावं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय?

SCROLL FOR NEXT