पालघर: जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी ४ वाजून 47 मिनिटांच्या सुमारास हा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली. डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे हादरे जाणवले. अचानक जमिनीला कंप जाणवू लागल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.
मात्र गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी, 28 जुलै रोजी सायंकाळी पहिल्यांदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली होती. या भूकंपाचे हादरे धुंदलवाडी, आंबोली, कासा तसेच परिसरात जाणवले होते. अचानक जमिनीला कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेक जण घराबाहेर पडले. त्यामुळे आज पुन्हा धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अधिकच वाढलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.