MHADA Lottery 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Mhada Lottery 2024 Result: नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! म्हाडाच्या घरांची आज सोडत, कुणाचं नशीब चमकणार?

Mhada Lottery 2024 Update: नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या घरांची आज सोडत निघणार आहे. त्यामुळे कुणाचं नशीब चमकणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखतारित्यात छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशीव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ११३३ घरे आणि ३६१ भूखंडासाठी सोडत निघणार आहे. १६ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात ही सोडत निघणार आहे.

११३३ घरे आणि ३६१ भूखंडासाठी एकूण ४,७५४ अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनामत रक्कमेसह ३९८९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. या घरांमध्ये पंतप्रधान आवास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना, सर्वसमावेशक योजनेच्या घरांचा समावेश आहे. पंतप्रधान आवास योजनेची ४२५ घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेची २० टक्के घरे, सर्वसमावेशक योजनेची ७९८ घरे आहेत. तसेच ३६१ भूखंड आहेत.

म्हाडाची सोडत ही अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. तर भूखंड हे सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठी आहे. अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी दिली आहे. नव्या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत होत आहे.

या पद्धतीत नोंदणीकरण आणि अर्जदारांची पात्रता निश्चिती झाल्यानंतर पुढे अर्जदार या प्रक्रियेत सहभागी होत आहे. विजेता घोषित झाल्यानंतर अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार आहे. तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात देकार पत्र पाठवले जाणार आहे.

सिडकोच्या ४० हजार घरांची सोडत रखडली

सिडकोच्या 40 हजार घरांची सोडत रखडल्याची माहिती समोर आली आहे. कंत्रटदाराला वाचवण्यासाठी सोडत रखडवल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सिडकोने वाशी, जुईनगर, खारघर, खानदेश्वर, तळोजा आणि द्रोणागिरी या भागात 40 हजारापेक्षा अधिक घरं तयार केली. मात्र, कंत्राटदाराला वाचवण्यासाठी ही घरं पडून असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सिडकोने घरं विक्री करण्यासाठी दोन कंत्राटदार कंपन्या नेमल्या होत्या. या कंपन्यांना सिडकोने सुमारे 700 रुपये कोटींचा ठेका दिला होता. सिडकोने आगाऊ रक्कम म्हणून 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. या कंत्राटदारांचा 'सकाळ'ने भांडाफोड केला. आता या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आता सिडको कोणतीही लॉटरी प्रक्रिया करण्याच्या विचारात नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT