Pankaja Munde  saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर एकच गोंधळ; पोलिसांनी केला कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला गालबोट लागलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Beed News In Marathi : भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava) गालबोट लागलं आहे. बीडमधील (Beed) भगवान गडावरील मेळाव्यानंतर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे मोठा गोंधळ झाला आहे. हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घातल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या तरुणांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर भाषणासाठी व्यासपीठावर दाखल झाल्या. त्यावेळी तरुणांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर पंकजा मुंडे काही वेळेसाठी शांत राहिले.

भाषण संपल्यामुळे पंकजा मुंडे व्यासपीठावरून ताफ्याकडे वळल्या. त्यानंतर तरुणांनी पुन्हा एकच गोंधळ केला. तरुणांनी पंकजा मुंडे यांच्याकडे जाण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे गोंधळ झाला. अखेर पोलिसांना तरुणांवर लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्ज केल्यामुळे गर्दी पांगली.

हुल्लडबाज तरुणांचा सुमारे आठ ते १० मिनिटे गोंधळ सुरू होता. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे वातावरणात शांतता निर्माण झाली. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे वाहन रवाना झाले. खासदार प्रितम मुंडे यांनी देखील समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण तरीही कार्यकर्ते ऐकण्याचे अवस्थेत नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT