Crime news Saam TV
महाराष्ट्र

Crime News: शाळेत जाताना अल्पवयीन मुलीची वाट अडवली, लॉजवर घेऊन गेले अन्...

Buldhana Minor abuse case: बुलढाण्यातील मेहकर शहरात एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी लैगिंक अत्याचार केलाय. दोन्ही युवकांविरोधात कारवाई करत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Bhagyashree Kamble

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाण्यातील मेहकर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी बळजबरी केली, तसेच तिला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केलाय. या भयंकर घटनेनं मेहकर शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन्ही युवकांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

मेहकर शहरात एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी लैगिंक अत्याचार केला आहे. अल्पवयीन मुलगी शाळेत जात होती. दोन युवक दुचाकीवरून आले. त्या दोघांनी मुलीची वाट अडवली. तिला जबरदस्तीने गाडीवर बसवलं आणि लॉजवर नेलं. लॉजवर नेत तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला. मोहन उर्फ राज चव्हाण आणि ओम पऱ्हाड अशी आरोपींची नावे आहेत.

या हादरवणाऱ्या घटनेनंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी दोन्ही युवकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र, लॉज मालकाविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. लॉज मालकाने अल्पवयीन मुलीला प्रवेश दिलाच कसा? हा प्रश्न उपस्थित करीत लॉज मालकावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरीकांनी केलीय.

विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या लॉजवर पोलिसांनी अनेकवेळा वेश्याव्यवसाय सुरू असताना कारवाई केली होती. तरीसुद्धा लॉज मालकाविरोधात कारवाई का केली जात नाही? अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे.

विजेंद्र धोंडगे असे लॉज मालकाचे नाव आहे. ते मेहेकर येथील महसूल विभागात कार्यरत आहेत. हॉटेलवर मागील काळात पोलिसांनी छापा टाकला होता, तेव्हा ८ जोडपे पकडले गेले होते. आताच्या प्रकरणात अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये प्रवेश दिलाच कसा? दिवसभर त्या लॉजवर अल्पवयीन मुलगी आणि २ मुले होते. ते जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करीत होते. हॉटेल मालक तेव्हा कुठे होते? त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरीकांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा ठप्प

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT