BJP News Saamtv
महाराष्ट्र

BJP News: २०२४ ची तयारी! भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील नव्या टीमची घोषणा; विनोद तावडे, पंकजा मुंडेंकडे कोणती जबाबदारी?

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रीय पातळीवरील नव्या टीमची घोषणा केली आहे..

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

BJP Party Changes News: आगामी लोकसभा तसेच विधानसभेच्या दृष्टीने देशातील राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाकडून पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात येत असून आता राष्ट्रीय पातळीवर भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत. (BJP Political News)

राष्ट्रीय पातळीवर मोठे बदल...

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये रणनीती आखाण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष संघटनेत मोठे फेर बदल करण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रीय पातळीवरील नव्या टीमची घोषणा केली आहे..

पंकजा मुंडे, विनोद तावडेंकडे जबाबदारी...

भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती केली गेली आहे.

याआधी भाजपकडून राज्य पातळीवरही मोठे बदल केले गेले होते. काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT