Medicine Price Drop: मधुमेह, उच्च रक्तदाब (बीपी), हृदयविकार आणि हाडांच्या कमकुवतपणाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी (NPPA) ने रोजच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 39 अत्यावश्यक औषधांच्या किमती (MRP) निश्चित केल्या आहेत. त्यामुळे या औषधांसाठी जास्त किंमत द्यायची गरज पडणार नाही. या निर्णयामुळे अनेक औषधांच्या किमतीत 20 ते 40 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
हा निर्णय ड्रग्ज प्राइसेस कंट्रोल ऑर्डर (DPCO), 2013 अंतर्गत घेण्यात आला आहे. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक औषधे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. नव्या यादीत उच्च रक्तदाब (High BP) हृदयविकार (Heart Problem), मधुमेह (Diabetes) , कॅल्शियमची कमतरता (Calcium deficiency), डोळ्यांचे संसर्ग(Eye infections) तसेच रेबीज (Rabies) यांसारख्या गंभीर आजारांवरील औषधांचा समावेश करण्यात आला आहे. या आजारांवरील उपचार दीर्घकाळ सुरू राहतात. त्यामुळे औषधांच्या किंमतीतील घट रुग्णांच्या मासिक आणि वार्षिक वैद्यकीय खर्चात मोठी बचत करू शकते.
किमती निश्चित करण्यात आलेल्या औषधांमध्ये क्लोपिडोग्रेल + ॲस्पिरिन + ॲटोरव्हास्टॅटिन या हृदयविकारावरील औषधाची कमाल किंमत 6.37 प्रति कॅप्सूल करण्यात आली आहे. उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या अम्लोडिपिन + बिझोप्रोलॉल + टेल्मिसार्टन या औषधाची किंमत 14.74 प्रति गोळी असेल. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 प्रति गोळीची किंमत 8.93 असणार. हृदयविकाराच्या झटका आल्यावर रुग्णाला दिले जाणारे टेनेक्टेप्लास इंजेक्शनची किंमत 60,238.27 ठरवण्यात आले आहे. तर नेपाफेनाक + मॉक्सिफ्लोक्सासिन आय ड्रॉप्सची किंमत 68.64 असेल. तर, अँटी-रेबीज इम्युनोग्लोब्युलिनची किंमत 119.48 रुपये करण्यात आली आहे.
NPPA च्या निर्देशानुसार, औषध उत्पादक कंपन्या आणि मेडिकल स्टोअर्स निश्चित केलेल्या कमाल किमतीपेक्षा अधिक दर आकारू शकणार नाहीत. तसेच सर्व कंपन्यांना औषधांच्या पॅकेजिंगवर नवीन MRP नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.