Measles Disease Saam Tv
महाराष्ट्र

Measles Disease : अमरावतीत गोवर आजाराचा शिरकाव; आरोग्य मंत्र्यांच्या धाकाने प्रशासनाने दडवली होती माहिती?

Measles Disease In Amravati: मुख्य बाब म्हणजे आरोग्य विभागाने ही माहिती आरोग्य मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेपर्यंत का दडवली? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अमर घटारे, अमरावती

Measles Disease In Amravati: अमरावती जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात गोवरचा आजाराचा (Disease) शिरकाव झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोवर आजाराचा जिल्ह्यात शिरकाव झाला असल्याची बाब अमरावतीच्या आरोग्य विभागाने दडवली असल्याचा आरोप होत आहे.

याचं कारण म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यामुळे आरोग्य विभागाने आतापर्यंत गोवरचा शिरकाव झाल्याची माहिती दडवली होती असा आरोप होत आहे. आरोग्यमंत्री हे जिल्ह्यातून जाताच आरोग्य विभागाने गोवरबाबत माहिती जाहीर केली आहे. (Amravati Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात गोवरचे आठ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत 249 संशयित नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अमरावती शहरातील एका ग्रामीण भागात तर गोवर आजाराचे 7 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे अमरावतीकरांची चिंता वाढली आहे. मुख्य बाब म्हणजे आरोग्य विभागाने ही माहिती आरोग्य मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेपर्यंत का दडवली? असा सवाल आता उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

गोवर म्हणजे काय?

गोवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. तो प्रथम कोणत्याही व्यक्तीच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. औषध आणि लसीकरणाने हा आजार टाळता येतो. जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे 'गोवर' हा आजार. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये संपूर्ण जगात सुमारे 1 लाख 10 हजार लोकांचा मृत्यू केवळ गोवरमुळे झाला. त्यापैकी बहुतेक मुले (Child) होती आणि त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी होते.

गोवरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

  • गोवरचे प्रारंभिक लक्षण म्हणजे तीव्र ताप. जर एखाद्या व्यक्तीला खूप ताप येत असेल तर समजावे की गोवरने त्याचे पहिले लक्षण दिले आहे.

  • विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 10-12 दिवसांनी ताप सुरू होतो आणि नंतर 4 ते 7 दिवस टिकतो.

एखाद्या व्यक्तीला खोकला, नाकातून पाणी येणे, डोळे लाल होणे, घसा खवखवणे आणि तोंडात पांढरे ठिपके असू शकतात. यासोबतच शरीरावर लाल पुरळ येणे ही गोवरची लक्षणे असू शकतात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT