Maval Accident Saam tv
महाराष्ट्र

Maval Accident : जुना मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, स्कूल बसला वाचवायच्या प्रयत्नात कंटेनर थेट दुकानात घुसला; महिलेचा मृत्यू

Maval News : अपघातामुळे जुना मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी वडगांव मावळ पोलीस दाखल झाले

दिलीप कांबळे


मावळ
: जुना मुंबई- पुणे महामार्गावर वडगांव चौकात मालवाहू कंटेनरचा विचित्र अपघात झाला. समोरून येणाऱ्या स्कुल बसला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कंटेनर चालक गंभीर जखमी आहे. चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

वडगांव (Maval) मावळ येथे मुंबईकरून पुण्याला येत असताना कंटेनर चालकाच्या वाहनासमोर स्कुल बस आली. शाळेच्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर सर्व्हिस रोडवरील दुकानात घुसला. (Accident) या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला कंटेनरने चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कंटेनर चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.   

सदर अपघातात कंटेनरने बसला देखील धडक दिली. सुदैवाने शाळेच्या बसमध्ये विद्यार्थी नव्हते; त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या अपघातामुळे जुना मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी वडगांव मावळ पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असून जखमी कंटेनर चालकाला रुग्णालयात रवाना केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?

तुमच्या माशांवर केमिकल स्प्रे? तुम्ही खाताय केमिकल मासे?

Maharashtra Live News Update: कळमेश्वर MIDC मध्ये बोगस युरिया बनविणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाचा छापा

कालव्यात पोहोयला गेले पुन्हा परतलेच नाही; पाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ तरुणांचा मृत्यू

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT