Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून नागरिक संतप्त

Maval News : शेतामध्ये चार वर्षांपासून गावातून निघणारे सांडपाणी येत होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी येऊन बेडकं, विंचू ,साप, येण्याचे प्रकार घडत होते. ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार केला.

दिलीप कांबळे

मावळ : गावातील गटारींमधून येणारे संपूर्ण सांडपाणी गावाबाहेर मोकळे सोडण्यात आले होते. हे सांडपाणी जवळच असलेल्या शेतात जाते. यामुळे बाजूलाच असलेल्या घरात किडे, साप, बेडूक घुसत असल्याचा त्रास चार वर्षांपासून सुरु आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून देखील याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकाने आज थेट ग्रामसभेत जात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. 

मावळच्या ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या खडकाळे येथे सदरचा प्रकार घडला असून रामचंद्र धावडे असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान रामचंद्र धावडे यांच्या शेतामध्ये चार वर्षांपासून गावातून निघणारे सांडपाणी येत होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी येऊन बेडकं, विंचू ,साप, येण्याचे प्रकार घडत होते. 

चार वर्षांपासून अनेक तक्रारी 

या प्रकाराबाबत धावडे यांनी चार वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. याबाबत अनेकदा विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता ग्रामपंचायत प्रशासन उडवा उडवीची उत्तरे देत होती. शिवाय कोणतीही कार्यवाही करत नव्हती. पावसाळ्यात हा त्रास अधिक वाढला होता. यामुळे धावडे यांचा परिवार मेटाकुटूला आला होता. 

ग्रामसभेत उडाला गोंधळ 

चार वर्षांपासून होणाऱ्या या त्रासाला कंटाळून संबंधित व्यक्तीने आज होत असलेल्या ग्रामसभेत प्रवेश केला. यानंतर भर ग्रामसभेत त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभेला उपस्थित ग्रामस्थांनी वेळेत त्यांना अडविल्याने पुढील दुर्घटना होण्यापासून वाचवले. मात्र या प्रकरणानंतर ग्रामसभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांना देखील बोलाविण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT