Khandala Ghat Accident Saam tv
महाराष्ट्र

Khandala Ghat : खंडाळा घाटात भीषण दुर्घटना; ट्रकवरील बांधलेले पाईप घसरले, कार व दुचाकीवर पडल्याने दोघांचा मृत्यू

Maval News : ट्रक चालकाने ब्रेक लावला. यामुळे ट्रकचा पुढील भाग काहीसा उचलला गेला. तर पाईप घसरत रस्त्यावर आले. त्यावेळी ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी व कार मधील दोन महिलाच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू

दिलीप कांबळे

मावळ : घाटाच्या रस्त्यावरून मोठे पाईप बांधून वाहतूक करणारा ट्रॉला मार्गस्थ झाला होता. घाट रस्ता असल्याने वाहने हळू चालत होती. याच वेळी अचानक बांधलेले पाईप मागच्या बाजूने घसरले. यावेळी मागे असलेल्या दुचाकी आणि कारवर जाऊन पडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात घडली आहे. यामुळे घाटरस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. 

जुन्या मुंबई- पुणे महामार्गाच्या खंडाळा बोरघाटात आज सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत मृत झालेल्या महिलांची नवे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र घाट रस्ता चढताना अचानकपणे अशी घटना घडेल याबाबत कोणी विचारही केलेला नव्हता. अशात पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये बांधलेले पाईप घसरून ते ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी गाडी व कारवर पडले आहेत. 

ब्रेक मारल्याने घसरले पाईप

जुने मुंबई पुणे महामार्गावर खोपोली घाटातून येणाऱ्या घाटातून एक ट्रक पाईप घेऊन घाट चढत होता शिंगरुबा मंदिराच्या वरील बाजूस हा ट्रक आल्यानंतर अचानक ट्रक चालकाने ब्रेक लावला. यामुळे ट्रकचा पुढील भाग काहीसा उचलला गेला. तर ट्रक मधील असलेले पाईप घसरत रस्त्यावर आले. त्यावेळी ट्रकच्या मागे असलेल्या एक दुचाकी व कार मधील दोन महिला यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाईप उचलण्याचे काम सुरु 

दरम्यान कारवर तसेच रस्त्यावर अवजड पाईप पडले आहेत. हे पाईप क्रेनच्या सहाय्याने उचलण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हा अपघात घडल्यानंतर खंडाळा घाट रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाईप उचलण्याचे काम सुरु आहे. तसेच नागरिकांची देखील गर्दी झाली असून पाईप उचलल्यानंतरच रहदारी सुरळीत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारची निर्यात बंदी, साखर उद्योग अडचणीत, 3 महिन्यांतच फिरवला निर्यातीचा निर्णय

भारतात लॉकडाऊन लागणार? इंधन संकटामुळे देश ठप्प होणार?

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई, महाराष्ट्रातून आणखी दोघांना बेड्या

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील अमनोली गावाजवळील पूल कोसळला, चार ते पाच गावांचा संपर्क तुटला

Ashok Kharat Case: उपजिल्हाधिकारीचं निलंबन; भोंदू बाबा खरात प्रकरणाशी काय आहे कनेक्शन?

SCROLL FOR NEXT