Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : मावळातील वनक्षेत्रात होणार देशी वृक्ष लागवड; अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून उपक्रम

Maval News : मावळ तालुक्यातील सोमटणे, गहुंजे, इंदोरी, टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री देवराईच्या सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

दिलीप कांबळे

मावळ : प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यात जैवविविधतेसाठी देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातून तालुक्यातील असलेल्या वनक्षेत्रात विविध प्रजातींच्या देशी वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. याची सुरवात लवकरच करण्यात येणार असल्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले असून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाच्या तयारीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला सयाजी शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदरचा उपक्रम पावसाळ्याच्या अनुषंगाने राबविण्यात येत आहे. 

वन्यजीवांचे संवर्धनास हातभार

पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही वेळ वृक्षारोपणासाठी अतिशय अनुकूल मानली जाते. मावळात नैसर्गिक पाणी अधिक उपलब्ध असल्याने नवीन रोपे लवकर रुजतात आणि परिसरातील वनस्पती व प्राण्यांची जैवविविधता वाढीस लागते. यामुळे ऑक्सिजन निर्मितीत वाढ होईल आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागेल. या उपक्रमातून पर्यावरण रक्षण, हरित महाराष्ट्र आणि शाश्वत विकास होणार आहे. 

वृक्षारोपणाला सुरवात 

दरम्यान मावळ तालुक्यातील सोमटणे, गहुंजे, इंदोरी, टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री देवराईच्या सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार याची सुरवात देखील करण्यात आली आहे. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सयाजी शिंदे या झाडाला पाणी टाकून सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT