Maval News Saam tv
महाराष्ट्र

Sunil Shelke : स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी कार्यकर्त्यांना उचकवताय; आमदार सुनील शेळके यांचा भेगडे यांच्यावर निशाणा

Maval News : येणाऱ्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहेत. जे येतील त्यांच्यासोबत आपण राहणार आहे. लोणावळा शहरातील काही लोक आम्हाला भेटतात. आम्हाला फक्त लोणावळ्याचा विकास करायचा आहे

दिलीप कांबळे

मावळ : एक माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आहे. जे म्हणतात साहेब मला आता कुठेतरी बसवा. गेल्या विधानसभेला तुम्ही जर एकनिष्ठ राहिला असता, तर नक्कीच भाजपने तुमचा विचार केला असता. तुम्ही देवेंद्र फडणवीससह नेत्यांना जे जे माझ्याबद्दल सांगितलं; ते मला मुंबईत सांगतात. बाळा भेगडे यांनी काय पराक्रम केले, काय गुण गायले तुमच्याबद्दल. पोपट भेगडे आणि बाळा भेगडे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही; अशा शब्दात आमदार सुनील शेळके यांनी निशाणा साधला आहे. 

स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळच्या वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेगडे यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही युती मिळून लढणार आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे पोपट भेगडे म्हणाले ५० हजार नागरिक भाजपमध्ये प्रवेश करणार. पण कधी करणार ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांच्यासोबत संबंध नाही; अशांना भाजपमध्ये घेतलं, तर आमची हरकत नाही. पण तुम्ही इतर कोणाचा प्रवेश करून घेतला तर आप सुरुवात तुम्ही करणार आणि आम्ही शेवट करू; असेही सुनील शेळके म्हणाले.

लोणावळ्याच्या विकासात राजकारण नाही 
येणाऱ्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहेत. जे येतील त्यांच्यासोबत आपण राहणार आहे. लोणावळा शहरातील काही लोक आम्हाला भेटतात. आम्हाला फक्त लोणावळ्याचा विकास करायचा आहे. यामध्ये भाजपचे प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतिनिधी, शिवसेना शिंदे गटाचे प्रतिनिधी, काँग्रेसचे प्रतिनिधी, ठाकरे गटाचे प्रतिनिधी भेटतात. या सर्वांना घेऊन मी लोणावळ्याचा विकास करणार आहे. यात मी कुठलेही राजकारण आणणार नाही. फक्त सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत बसणारी चार लोक यांना मी बाजूला ठेवणार आहे.

सर्वाना सोबत घेऊन काम 
विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझ्यासोबत एकनिष्ठ होता. त्यामुळे मी निवडून आलो. याची मला आजही जाणीव आहे. आपल्या गावचा विकास करायचा असेल, तर भाजपचा असो कि शिवसेनेचा सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करू. आपल्याला संघर्ष जेवढा टाळता येईल तेवढा टाळा. पण भाजपच्या या कार्यकर्त्याला घ्या त्या कार्यकर्त्याला घ्या हा निर्णय तुमचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT