Lonavala News Saam tv
महाराष्ट्र

Lonavala News: पर्यटनासाठी आलेल्‍या कुटूंबावर दुःखाचा डोंगर; मुलीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्‍या कुटूंबावर दुःखाचा डोंगर; मुलीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळ्यात आणखी एका बालकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यातील जलतरण तलावामुळे तीन बालकांचे जीव गेले. त्यामुळेच (Lonavala) लोणावळ्यातील जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Maharashtra News)

लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीचा जलतरण तलावात बुडून (Death) मृत्यू झाला. डोंबिवलीतील सय्यद कुटुंबीय लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. तेव्हा एका खाजगी रिसॉर्टमध्ये हे कुटुंबीय नाश्ता करत होते. तेव्हाच हानियाझैरा सैय्यद ही दोन वर्षीय चिमुरडी तिसऱ्या मजल्यावर पोहचली अन्‌ तिथल्या जलतरण तलावात पडली. जीव वाचविण्यासाठी ती आकांताने ओरडली. कुटुंबिय तिच्या दिशेने धावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

पाचशे अनधिकृत तलाव

गेल्या सहा महिन्यामध्ये लोणावळ्यात तीन बालकांचा जीव गेला आहे. त्यामुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. एकामागोमाग एक घटना घडल्याने लोणावळ्यातील जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात हजारभर जलतरण तलाव असल्याचे अन्‌ त्यातील पाचशे तलाव अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Maval Heavy Rain : मुसळधार पावसाचा तडाखा; मावळ झाले जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन नव्या मेट्रो स्थानकाला सरकारने दिली मंजुरी, वाचा सविस्तर

Reducing sweets: जगभरात 250 कोटी लोकं 'या' गंभीर आजाराशी झुंजतायत; आहारातील गोड कमी करणं ठरेल उपाय, WHO चा इशारा

Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

SCROLL FOR NEXT