Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : मावळमध्ये प्राचार्या विरोधात गुन्हा दाखल; निवडणुकीच्या कामासाठी असहकार्य

Maval News : जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर जबाबदारी निश्चित करून या कामांसाठी प्रशासन, ग्रामपंचायत, तसेच शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दिलीप कांबळे

मावळ : विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांचा देखील समावेश आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे दाखवून निवडणुकीचे काम टाळत असतात. दरम्यान शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली असता प्राचार्यांकडून त्यास सहकार्य न केल्याने थेट प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) बिगुल वाजल्यानंतर प्रशासनस्तरावर कामाला सुरवात करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर जबाबदारी निश्चित करून या कामांसाठी प्रशासन, ग्रामपंचायत, तसेच शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी आता प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. त्यानुसारच (Maval) मावळच्या तळेगाव- दाभाडे येथील सेंट माउंट हायस्कूलमधील ५५ शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान हायस्कुलचे प्राचार्य यांनी निवडणुकीच्या कामात असहकार्य केल्याने तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या शाळेतील 55 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी आदेश काढण्यात आले होते. परंतु प्राचार्यांनी ते घेण्यास नकार दिला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कलम १३४ अंतर्गत प्राचार्यां विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई सेंट्रलमधील कैलास अपार्टमेंट्समध्ये आग

Zoom Hacking Alert: सावधान! Zoom युजर्ससाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा, व्हिडीओ कॉल्समुळे वाढेल धोका

Maharashtra Politics: जो महापौरपद देतील, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, 'या' महापालिकेत भाजप-ठाकरेसेनेची युती होण्याची शक्यता

Kolhapur Mayor Race: कोल्हापुरात महापौरपदाची ‘खांडोळी’ की स्थैर्य? महायुतीतच महापौर पदावरून रस्सीखेच

अजित पवारांसह विमानात ५ जण होते की ६ जण..? शंकांचं काहूर सुरू असतानाच उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय सांगितलं? VIDEO

SCROLL FOR NEXT