Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : बंधाऱ्यावरून कार चालविणे आले अंगाशी; कार कोसळली इंद्रायणी नदीत

Maval News : प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करून देखील वाहन चालक धोकादायक प्रवास करीत आहे

Rajesh Sonwane

मावळ : कुंडमळ्यावर पर्यटनासाठी अनेकजण येत असतात. आकर्षण असलेल्या या धबधब्यावर (Maval) नाहक स्टंटबाजी केली जाते. असाच स्टंट करत कुंडमळ्यावर धाडस करत नदी ओलांडण्याचे धाडस जीवावर बेतले असते. नदी ओलांडत असताना कारवरील नियंत्रण सुटून कार थेट नदीच्या (Accident) डोहात जाऊन पडली. (Live Marathi News)

मावळातील पर्यटकांचे आकर्षण असलेला कुंडमळा धबधबा लोकप्रिय आहे. याच कुंडमळ्यावरील कोल्हापूर बंधाराऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहन चालवताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी इंद्रायणी नदीच्या डोहात पडली. कुंड मळ्यावरून नको ते धाडस करून नदी ओलांडत होता. त्याचवेळी ही घटना घडली. घटनास्थळी मोठी क्रेन आणून या गाडीला बाहेर काढण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघे बचावले 

डोहात पडलेल्या गाडीत दोन प्रवासी होते; सुदैवाने ते बचावले आहेत. ही गाडी पिंपरी येथील एका पर्यटकाची होती. दरम्यान प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करून देखील वाहन चालक धोकादायक प्रवास करीत आहे. मात्र अशा पद्धतीने धोकादायक बंधाऱ्यावरून प्रवास केला; तर जिवावरही बेतू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने प्रवास करू नये; असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून कार्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT