Dog Attack Saam tv
महाराष्ट्र

Dog Attack : मुळशीत मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Maval news : पिंपरी- चिंचवड शहरातील भटकी कुत्रे पकडून मावळ, मुळशी या भागातील जंगलात सोडले जातात.

दिलीप कांबळे

मावळ : कॉलनी. रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. रस्त्याने पायी चालणाऱ्या किंवा दुचाकीच्या मागे धावून हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. यातच मुळशीच्या घोटावडे फाटा येथे मोकाट कुत्र्यांनी एका मुलावर अचानक जीवघेणा हल्ला केला. कुत्र्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. 

मोकाट कुत्र्यांची दहशत सुरूच आहे. मुळशी येथील घोटावडे फाटा येथे कुत्र्यांनी केला एका लहान मुलांवर केला जीव घेणा हल्ला (Dog Attack) केला. सदर मुलगा सिंबायोसिस हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील भटकी कुत्रे पकडून मावळ, मुळशी (Mulshi) या भागातील जंगलात सोडले जातात. मात्र हीच कुत्रे अन्नाच्या शोधात जंगलातून परत गावात येतात आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. अशातच एका मुलावर कुत्र्यांनी झडप घालून त्याला घायाळ केलेले आहे.

मुळशीमध्ये अनेक वेळा मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट बघण्यासाठी मिळाला आहे. या पुर्वी देखील कोळवण खोऱ्यात एका जेष्ठ नागरिकांवर हल्ला केला होता. मुळशी तालुक्यात गटविकास अधिकारी पुर्णपणे वेळ देत नसल्याने याची तक्रार कोणाकडे करायची व या मोकाट कुत्रांचा बंदोबस्त कोण करणार? असा सवाल नागरिक आता उपस्थित करू लागले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT