Bee Attack Saam tv
महाराष्ट्र

Bee Attack : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांवर मधमाश्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Maval News : डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. यामुळे येथे सकाळी आठ- नऊ वाजेपर्यंत फिरणाऱ्यांची वर्दळ असते. यावेळी डोंगर चढत असताना तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला

दिलीप कांबळे

मावळ : रोज प्रमाणे मॉर्निग वॉकसाठी फिरायला गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी मावळच्या नवलाख उंबरे येथे डोंगर परिसरात घडली आहे. मधमाश्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मावळच्या नवलाख उंबरे डोंगरावर आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत हनुमंत बबूशा कोयते (वय ४४) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. उंबरे डोंगर परिसरात मावलमधील नागरिक रोज सकाळी मॉर्निग वॉकसाठी जात असतात. आज देखील पहाटेच्या सुमारास अनेकजण फिरण्यासाठी गेले होते. 

डोंगर चढत असतानाच हल्ला 

डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. यामुळे येथे सकाळी आठ- नऊ वाजेपर्यंत फिरणाऱ्यांची वर्दळ पाहण्यास मिळत असते. यावेळी डोंगर चढत असताना डोंगरमधील तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. यात चौघेजण गंभीर जखमी झाले होते. काहीजणांनी जखमींना उपचारासाठी नेण्यात आले. 

एकाची प्रकृती चिंताजनक 

मधमाश्यांची केलेल्या या हल्ल्यात हनुमंत कोयते यांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मधमाश्यांची केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात चांगलीच धावपळ उडाली होती. अनेकांनी येथून काढता पाय घेतला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT