Trupti Desai protest against alleged illegal mining in Maval saam tv
महाराष्ट्र

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

Maval Mining Controversy: मावळच्या आंबळे परिसरातील कथित बेकायदेशीर उत्खननाच्या मुद्द्यावर तृप्ती देसाई यांनी मावळ तहसील कार्यालयावर आंदोलन केलं. उत्खननाची चौकशी करून कथित महसूल नुकसान वसूल करण्याची मागणी करण्यात आली.

Bharat Jadhav

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी

मावळच्या आंबळे एमआयडीसीतील आंबळे परिसरात कथित बेकायदेशीर उत्खननाचा मुद्दा तापलाय. भू-माता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज थेट मावळ तहसील कार्यालयावर धडक देत बोंबाबोंब आंदोलन केलंय. वनीकरणाच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केलाय. विशेष म्हणजे, अडीचशे ते तीनशे फूट खोल खोदकाम झाल्याचा दावा करण्यात आलाय.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या कथित उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोपही करण्यात आलाय. इतकंच नाही, तर जमिनीच्या नोंदी आणि वनीकरणाच्या दाखल्यांबाबत शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय. या कथित उत्खननातून शासनाचा बुडालेला महसूल दंडासह वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्खनन करणाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांनी केलाय. त्यामुळे कथित खनन माफियांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय. आता या गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेतं? कथित उत्खननाची चौकशी कधी होते? आणि शासनाचा बुडालेला महसूल वसूल होतो का? याकडे मावळकरांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर डिझेल चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ट्रकमधून ५०० लिटर डिझेल लंपास

Maharashtra Politics: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी आणखी एका मंत्र्याचे अधिकार काढून घेतले, राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

SCROLL FOR NEXT