गॅस परवडेना; जुनं ते सोनं म्हणत, गृहिणींनी दिली चुलीस पसंती ! दिलीप कांबळे
महाराष्ट्र

गॅस परवडेना; जुनं ते सोनं म्हणत, गृहिणींनी दिली चुलीस पसंती !

स्वयंपाकाचा गॅस पंचवीस रुपयांनी महागला आता गॅस साठी 890 रुपये मोजावे लागतात. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचा जीव मेटाकुटीला आला असून जुनं ते सोनं म्हणत मातीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यास गृहिणी पसंती देत आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर  मध्ये पंचवीस रुपयांनी वाढ झाले त्यामुळे गॅस 890 रुपये होणार आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाला घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक हैराण झालाय त्यातच सिलेंडरच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे पवनमावळातील अनेक गावांमध्ये मातीच्या चुलींना मागणी वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर कनेक्शन दिले गेले होतं दरम्यान सबसिडी जमा होत होती तोपर्यंत गॅसचा वापर सुरळीत सुरु होता. मात्र, आता सबसिडी बंद झाली आहे. त्यातच गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर बाजूलाच करून मोठ्या प्रमाणात मुलींना मागणी वाढली आहे आम्ही मोलमजुरी करून घरगुती खर्च भागवतो आता घरगुती गॅस ची किंमत साडे आठशे नऊशे रुपये झाली आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे गॅस वापरणे बंद करून चुलीवरच स्वयंपाक करत आहे. कोरोनामुळे हाताला काम नव्हते सर्व घराची मंडळी घरातच होतो त्यातच गॅस सिलेंडरचे भाव वाढले त्यामुळे घरचे बजेट कोलमडले आहे गॅस चा खर्च परवडणारा नसल्याने आम्ही चुलीवर स्वयंपाक करीत आहे चुलीसाठी सरपन जंगलात कुठे मिळते आणि चुलीवरचं जेवण केल्याने आत्माही तृप्त होतो.

कोरोनाच्या काळात हाताला काम नव्हते. आता सिलेंडरचे भाव वाढल्याने पवन मावळत दिवसाला सात ते आठ चुलि तयार करतो आणि रोजच विकल्या जातात. चुली तयार करण्यासाठी काळा मातीची तसेच  मजबुतीसाठी राखेचा व घोड्याच्या लिद चा वापर केला जातो लहान मोठ्या चुलीची किंमत शंभर रुपयांपासून ते साडेतीनशे रुपये पर्यंत आहे. 

तीन दशकांवर्षापूर्वी प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आपली आईच तयार करत असे त्यानंतर धुराचा त्रास होतो, म्हणून त्याची जागा गोबर गॅस ने घेतली. गायी-म्हशींची कमतरता असल्यामुळे हे पण बंद झालं त्यानंतर त्याची जागा घेतली LPG गॅसने मात्र दर महिन्याला गॅसचे भाव वाढतच आहेत. हा गॅस परवडेनास झाला त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा जीव मेटाकुटीला आला आहे. जुनं ते सोनं म्हणून परत एकदा ग्रामीण भागातील महिला चुली कडे वळताना दिसत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT