Maval Crime Saam tv
महाराष्ट्र

Maval Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेसोबत केले भयंकर; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

Maval News : नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या तळेगाव- चाकण रस्त्यावर पायी जात असताना दोन युवकांनी त्यांना थांबवले. तसेच महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकाने बोलण्यात गुंतविले

दिलीप कांबळे

मावळ : रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांजवळील दागिने लांबवीले जात असल्याचे घटना मागील काही दिवसांपासून घडत होत्या. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरटे हात साफ करत होते. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून आणखी चौकशी सुरु आहे.  

मावळच्या तळेगाव चाकण रस्त्यावर काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. यात नलिनी ओंकार गायकवाड या माळवाडी येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या तळेगाव- चाकण रस्त्यावर पायी जात असताना दोन युवकांनी त्यांना थांबवले. तसेच महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकाने बोलण्यात गुंतविले. तर दुसऱ्याने संधी साधत गळ्यातील माळ तोडली. 

९० हजाराचे दागिने लांबवीले 

दरम्यान चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरली होती. घटनेनंतर श्रीमती गायकवाड यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकारची माहिती देत पोलिसात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. 

दोघे चोरटे ताब्यात 

पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेला पत्ता विचारण्याच्या बाहण्याने थांबून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांनी आणखी असे काही प्रकार केले आहेत का? याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT