Amravati Umesh Kolhe murder case Ani Tweeter
महाराष्ट्र

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात

आतापर्यंत या प्रकारना मध्ये पोलिसांनी सात आरोपींना त्याब्यात घेतल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - देशात खळबळ उडवणाऱ्या अमरावती (Amravati) येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इरफान खान असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आधीच सहा जणांना अटक केली आहे. इरफान खानची अटक ही अमरावती पोलिसांची (Amravati Police) मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला नागपूर येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रकारना मध्ये पोलिसांनी सात आरोपींना त्याब्यात घेतल आहे.

हल्लेखोरांनी उमेश कोल्हे यांना रस्त्यातच गाठलं. चाकूने सपासप वार केले. या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. मुदस्सीर आणि शाहरूख पठाण यांना 23 जूनला अटक करण्यात आली. अब्दुल तौफिक, शोएब खान, अतिब रशीद या तिघांना 25 जूनला अटक करण्यात आली. तर आज या प्रकरणातला सातवा आरोपी शेख इरफान शेख रहीम वय याला अटक करण्यात आली.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषितांविरोधात एका वृत्त वाहिनीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद देशासहित आखाती देशात देखील उमटले होते. याच नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. मात्र, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यानंतर २१ जून रोजी कोल्हे यांची हत्या झाली होती. कोल्हे यांची हत्या ही नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळेच झाल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT