Massive tree cutting spotted near Tapovan in Nashik, where over 300 mature trees were secretly felled for an STP project. Saam Tv
महाराष्ट्र

तपोवन शेजारी शेकडो वृक्षांचा कत्तलेआम, वृक्ष आणि विरोधावर सरकारची कु-हाड

Massive Green Cover Destroyed Near Tapovan: तपोवनातील झाडांवर कु-हाड पडणार म्हणून नाशिककरांनी महापालिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला... मात्र याचं तपोवनाशेजारील 300 झांडाचा एका प्रकल्पासाठी कत्तलेआम करण्यात आलाय... नेमका तो प्रकल्प काय आहे? तपोवनाशेजारील वृक्षसंपदा उद्धवस्त करण्याचा डाव कुणी आखला...

Snehil Shivaji

नाशिकात सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी पवित्र पावन तपोवनातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा तुघलकी निर्णय प्रशासनानं घेतल्यानंतर त्याला जोरदार विरोध होत असतांना आता प्रशासनानं याच विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळलंय. होय, तुम्ही जे ऐकलंत ते खरंय. नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजला असतांना तपोवनाच्या शेजारी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आलीये. पाहा, प्रशासनानं कशा पद्धतीनं इथे मोठ मोठ्या वृक्षांचा कुणाला खबरही लागु न देता कसा समूळ नाश केलाय

तपोवनापासून 500 मीटर अंतरावर झाडांची कत्तल

नव्या मलनि:सारण प्रकल्पासाठी ३०० झाडांचा बळी

447 झाडतोडीस परवानगी असल्याचा प्रशासनाचा दावा

तोडलेल्या झाडांच्या फांद्या-खोडं मातीत गाडले

आणखीन 147 झाडांवर कुऱ्हाड चालण्याची भीती

वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना प्रशासनानं अक्षरश गंडवलं. एकीकडे तपोवनातील 1800 झाडांचा हरितसंहार करणार असल्याचा मुद्दा जागवून प्रशासनानं पर्यावरणप्रेमींचे लक्ष तपोवनाकडे केंद्रीत केलं आणि दुसरीकडे गेल्या 10 दिवसात दिवसरात्र मोठंमोठ्या झाडांवर कु-हाड चालवली. झाडं तोडल्याचं लपवण्याचा आटोकाट प्रयत्न देखील प्रशासनानं केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केलाय. ऐका काय म्हणतायेत प्रत्यक्षदर्शी

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनानं जोरदार तयारी केलीये. अंत्यत नियोजनपुर्ण असा हा सिंहस्थ कुंभमेळा झालाच पाहिजे. मात्र त्यासाठी निसर्गाची हानी नको. वृक्षतोडी विरोधात नेते अभिनेते पर्यावरणप्रेमी समाजसेवक सामान्य जनता सगळेच एकत्र आलेले असतांना सरकारनं मात्र कुणाच्याही विरोधाला न जुमानता इथल्या झाडांची गुपचुप कत्तल केलीच.

ज्या साधूसंतांसाठी अरण्यवनाला उदध्वस्त करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलीये. त्याच जंगलात संसारधर्माला त्यागून साधू संतांनी दिक्षा मिळवलीये. त्यामुळे कुंभमेळ्याच्या नावाखाली होणाऱ्या या हरितहत्याकांडानंतर आता पर्यावरणप्रेमी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT